प्रतिनिधी / नागठाणे
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा कै. सुहासिनी इर्लेकर स्मृती साहित्य पुरस्कार कवयित्री अंजली ढमाळ यांच्या ‘ज्याचा त्याचा चांदवा’ या कवितासंग्रहास जाहीर झाला आहे.
अंजली ढमाळ यांचा हा पहिलाच कवितासंग्रह आहे. नवोदित कवींच्या गटातून त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षिका ते राज्यकर उपआयुक्त असा त्यांचा प्रवास आहे. ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे, सुमती लांडे, आसावरी काकडे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय कृष्णाजी पाटील, पुणे क्षेत्रीय अपर राज्यकर आयुक्त धनंजय आखाडे, पु.ल. देशपांडे कला अकादमीचे माजी प्रकल्प संचालक आशुतोष घोरपडे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Previous Article…ही दिल्लीकरांची इच्छा : जयंत पाटील
Next Article मध्य प्रदेशात दोन दिवसांचा कडक लॉकडाऊन!









