प्रतिनिधी / नागठाणे :
कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या १५ म्हैशींची प्राणीमित्राच्या सतर्कतेने बोरगाव पोलिसांनी सुटका केली.
प्राणीमित्र प्रतीक आप्पासाहेब ननावरे (रा.खारघर,नवी मुंबई) हे कामानिमित्त कराड येथे आले होते. सोमवारी सकाळी ते ते परत मुंबई येथे जात असताना बोरगाव ता.सातारा गावानजीक पुढे चाललेल्या ट्रकमधून जनावरे ओरडत असल्याचा आवाज आल्याने याची माहिती त्यांनी सातारा कंट्रोल रूमला दिली व गाडी थांबवली. बोरगाव पोलीस घटनास्थळी पोहचल्यावर ट्रकमध्ये पाहिले असता १५ म्हैशी दाटीवाटीने व क्रूरतेने बांधलेल्या आढळल्या. याची फिर्याद प्रतीक ननावरे यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी वाहतूक करणाऱ्या अरबाज मुनेर मुल्ला व अमर हाजी शेख (दोघे रा.इचलकरंजी,ता.हाताकलंगे,जि. कोल्हापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी १५ म्हैशी व एक ट्रक असा ९ लाखांचा मुद्देमाल जप्त करून मैशी वेळे(ता.खंडाळा) येथील गो आश्रमात पाठवून दिल्या.