वार्ताहर / औंध
टेस्ट करताना सर्वांना धाकधूक काय रिपोर्ट येणार याचीच मनात काळजी. औंध पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांची आज कोरोना रँपिड अँन्टिजेन टेस्ट करुन घेण्यात आली. तब्बल 38 जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वाःस टाकला. आणि पुन्हा नव्या जोमाने कोरोनाशी लढण्यासाठी मैदानात उतरण्याचा निश्चय केला आहे.
कोरोनाने सगळीकडे थैमान घातले आहे. लोकांच्या रक्षणासाठी पोलीस धाडसाने मैदानात उतरून काम करीत आहेत. अनेक पोलीस कोरोनाबाधित झाले आहेत. तर काहींना प्राण गमवावे लागले आहेत. दैनंदिन कामामुळे अनेकांशी संपर्क येत असल्याने कर्मचारी आणि कुटुंबात सुध्दा धाकधूक आहे.त्यामुळे पोलीस स्टेशनमधील सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तमराव भापकर, पोलीस उपनिरीक्षक सोमदे आणि 38 कर्मचारी यांची ग्रामीण रुग्णालयात अँन्टिजेन टेस्ट करण्यात आली. टेस्ट घेण्यापूर्वी अनेकांच्या मनावर अहवाल काय येईल असे दडपण होते. मात्र सर्वांचेच अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे पोलिसांनी कोरोनाला पळवून लावल्याचे स्पष्ट झाले आहे.
कामाच्या निमित्ताने लोकांशी संपर्क येत असतो. काळजी घेतली तरी प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करताना अडचणी आहेतच तरी देखील कर्मचारी धाडसाने काम करीत आहेत. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने आज सर्वांची कोरोना अँन्टिजेन टेस्ट केली परंतु सर्वांचेच अहवाल निगेटिव्ह आले आहेत. – उत्तमराव भापकर { सहाय्यक पोलीस निरीक्षक औंध }
Previous Articleरत्नागिरी जिल्ह्यात 73 नवे कोरोना पॉझिटिव्ह तर पाच बळी
Next Article लोकमान्यतर्फे गणेश भक्तांना आरती ऍपची भेट









