शाहूपुरी : सातारा नगरपरिषदेची हद्दवाढ होवून शाहूनगर हा त्रिशंकु भाग नगरपरिषद हद्दीमध्ये समाविष्ट झालेला आहे. शाहूनगर येथील एस.टी. कॉलनी-गुरुकृपा कॉलनी ते अजिंक्य बझार चौक हा रस्ता खूप रहदारीचा रस्ता आहे. या रस्त्याचीदुरावस्था झालेली आहे. यामुळे वाहन चालकांना व पादचारी यांना फार मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, साईडपट्टी खचलेली असत्यामुळे अपघात होवून वाहन चालक व नागरीकांच्या जिवीताला धोका निर्माण झालेलाआहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्त करण्याची मागणी ॲड. सचिन तिरोडकर यांनी नगराध्यक्ष माधवी कदम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
Previous Articleपंतप्रधान मोदींच्या हस्ते नूतन संसद वास्तूचे भूमीपूजन
Next Article लष्करातील शीख सैनिकांना बंडासाठी चिथावणीचा प्रयत्न









