प्रकल्प संचालक अविनाश फडतरे, जिल्ह्यात 1 हजार 65 बचत गटांचे उद्दिष्ट, अतिदुर्गम भागात सॅनिटरी नॅपकिन पोहचवण्याचा प्रयत्न
प्रतिनिधी / सातारा
महिलांना घरबसल्या सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध व्हावे म्हणून ग्रामीण जीवनोन्नाती अभियानामार्फत ‘जागर अस्मितेचा’ हे अभियान सुरू करण्यात आले आहे. बचत गटांचे बुकिंग सुरू असून अकरा तालुक्यामध्ये 1 हजार 65 गटांचे उद्ष्टि आहे. त्यातर्गंत 900 गटांनी अस्मिता प्लस ऍप च्या माध्यमातून रिर्चाज केले आहेत. 15 ते 31 ऑगस्ट दरम्यानचे हे रिचार्ज राज्यात पहिला क्रमांकावर पोहचल्याची माहिती ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अविनाश फडतरे यांनी दिली.
अस्मिता प्लस ऍपच्या माध्यमातून ऑर्डर बुकिंग करणे. ऑर्डर बुकिंग केल्यानंतर सर्वसाधारण 20 दिवसांमध्ये सॅनिटरी नॅपकिन त्या गटापर्यंत पोहचवण्यात येणार आहेत. हे सॅनिटरी नॅपकिन दोन प्रकारचे येणार आहेत. यामध्ये अुनदानित व विनाअनुदानित प्रकार आहेत. विनाअनुदानित प्रकारचे नॅपकिन बचत गटांना गावातील किंवा गावाबाहेरील महिलांना विकता येणार आहेत.
परंतु अनुदानित नॅपकिनसाठी जिल्हा परिषद शाळेतील 11 ते 19 वयोगटातील मुली लाभार्थी आहेत. या वयोगटातील मुलींना अस्मिता कार्ड देण्यात येणार आहे. त्यांची जन्मतारखेप्रमाणे यादी घेतली असून आपले सरकार सेवा केंद्रामार्फत त्यांची नोंदणी सुरू आहे. नोंदणीनंतर मुलीच्या नावाचे कार्ड तयार करून कार्डच्या माध्यमातून हे नॅपकिन त्या मुलींना देण्यात येणार आहेत.
ज्या गावाची लोक संख्या 3 हजार पर्यंत आहे त्या गावातील एका गटाकडे हे काम दिले आहे. 3 हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱया गावात दोन गटांची निवड केली आहे. ग्रामीण भागात 20 ते 25 टक्के महिला नॅपकिनचा वापर करतात अशी महिती आरोग्य विभागाकडून सांगण्यात आली. पहिल्या टप्प्यामध्ये अतिदुर्गम भागात 1 हजार गटामार्फत सॅनिटरी नॅपकिन पोहचविण्याचे उद्ष्टि असल्याची माहिती फडतरे यांनी दिली.









