प्रतिनिधी / नागठाणे :
अपशिंगे (मि.) ता.सातारा येथील अमेय संजय निकम याने दसडा (गुजरात) येथे झालेल्या ८ व्या वेस्ट झोन शॉर्टगन चॅम्पियनशीपमध्ये घवघवीत यश संपादित केले. त्याने ज्युनिअर मेन गटात रौप्यपदक प्राप्त केले. यापूर्वी बालेवाडी (पुणे) येथे झालेल्या २४ व्या कॅप्टन एस.जे.झझिकल महाराष्ट्र स्टेट शूटिंग चॅम्पियनशीपमध्ये देखील सुवर्णपदक प्राप्त केले आहे. याची दिल्ली येथे होणाऱ्या नॅशनल शूटिंग चॅम्पियनशीपसाठी निवड झाली आहे.
या स्पर्ध्येत ज्युनिअर वूमन गटात तनिष्का खुटवड हिने सुवर्णपदक प्राप्त केले.त्याचप्रमाणे रणवीर खुटवड, इंद्रजित खुटवड व अथर्व काळे यांनीही सुयश संपादित केले. या सर्व खेळाडूंचीही दिल्ली येथील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यांना प्रिसाईज शूटिंग क्लबच्या हेमंत बालवडकर यांनी प्रशिक्षण दिले. त्यांच्या या यशाबद्दल सहकार तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खा.उदयनराजे भोसले, खा.श्रीनिवास पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, शशिकांत शिंदे, महाराष्ट्र माथाडी कामगार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय निकम (बापू),अपशिंगे (मि.) च्या सरपंच सारिका गायकवाड, उपसरपंच उमेश निकम तसेच ग्रामस्थानी अभिनंदन केले.









