प्रतिनिधी / सातारा
संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आहे. सर्वच स्थरातले नागरिक आर्थिक दुर्बल झाले आहेत.असे असताना जिल्ह्यातील शिक्षण संस्था अडवणूक करून लूट करत आहेत,राष्ट्र पुरुषांची नावे संस्थांना दिली असून लूट सुरू आहे.शासनाने दिलेले नियम न पाळल्यास शाळेच्या बाहेर रस्त्यावर शाळा भरवू असा इशारा दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी दिला आहे.निवेदनावर अर्जुनराव साळुंखे, रमेश पिसाळ, महादेव डोंगरे यांच्या सह्या आहेत.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, गेल्या सहा महिन्यांपासून शासनाने लॉक डाऊन जाहीर केला आहे.अनेकांचे रोजगार गेले आहेत.मध्यम वर्गातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करायच्या म्हणले की त्यांच्याकडे पैसे शिल्लक नाहीत.अशा परिस्थितीत ऑन लाईन शिक्षणाच्या नावाखाली अनेक शैक्षणिक संस्थांनी सामान्य पालकांना पाल्यांच्या माध्यमातून फी भरण्याचा तगादा लावला आहे.चालू शैक्षणिक वर्ष चालू होऊन तीन महिन्यांच्या कालावधी झाला आहे.परंतु अद्याप शासनाने शाळा सुरू करण्यास परवानगी दिली नाही.तरीही फी भरण्याची सक्ती करणे हे हुकूमशाहीचे लक्षण आहे.वेळोवेळी शासनाने फी कमी करण्याच्या संदर्भात किंवा फी कमी करण्यास तगादा न लावण्यास संबंधित मंत्र्यांनी जाहीर केले आहे. असे असताना बाल मनावर विपरीत परिमाण होतील अशा पध्दतीने संस्था चालकांनी सतत पैशाची मागणी सुरू केली आहे.
संबंधित संस्थेच्या चालकांना फी कमी करण्याच्या सूचना देण्यात याव्यात किंवा ज्या संस्था सक्षम आहे त्यांना माफ करण्यास विनंती करावी.काही संस्था फी भरली नाही म्हणून धमकावत आहेत.ऑन लाईन परीक्षेचा कोड देणार नाही.परीक्षा घेणार नाही.ऑन लाईन क्लासला सहभागी करून घेणार नाही.असे निदर्शनास आले आहे.त्या विवंचनेतून एखाद्याने आत्महत्या केल्यास मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.काही संस्थांनी 1 सप्टेंबर पासून ऑन लाईन परीक्षेचे नियोजन केले आहे.राष्ट्र पुरुषांची नावे संस्थांना दिली असून लूट सुरू आहे.शासनाने दिलेले नियम न पाळल्यास शाळेच्या बाहेर रस्त्यावर शाळा भरवू असा इशारा दिला आहे.
Previous Articleजियोफायबरची फ्री ब्रॉडबँडची ऑफर
Next Article विक्रीचा प्रभाव : सेन्सेक्स 839 अंकांनी कोसळला









