प्रतिनिधी / सातारा
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी अजिबात गर्दी करू नये.खूप महत्वाचे काम असेल तरच; कार्यालयात यावे, असे कळकळीचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
नागरिक बाजारपेठेत तसेच; कार्यालयांमध्ये गर्दी करीत आहेत. या पार्श्वभूमीवर भागवत यांनी पुढे म्हटले आहे की कार्यालयात येताना ज्या व्यक्तींची गरज आहे, तेवढ्याच व्यक्तीने यावे.येताना मास्क वापरावा.अनेक वेळा एखाद्या व्यक्तीच्या सोबत अनेक व्यक्ती असतात.त्यामुळे त्यांची चर्चा होते.गप्पा होतात.सामाजिक अंतर पाळले जात नाही.या सर्वांमुळे विषाणू ची साखळी तोडण्यास अडथळे निर्माण होत आहेत आणि प्रादुर्भाव वाढत आहे .त्यामुळे कोणत्याही कार्यालयात जाताना अति महत्त्वाचे काम असेल तरच जावे आणि फक्त एकाच व्यक्तीने जावे.
गर्दी करू नये.सातत्याने मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे, वारंवार हात धुणे ही यशाची त्रिसूत्री आहे.या तीन गोष्टी सातत्याने पाळाव्यात, असेदेखील श्री भागवत यांनी पुढे म्हटले आहे.प्रशासन वारंवार सूचना देत आहे .त्यांचे काटेकोरपणे अनुपालन करावे.आरोग्य, पोलीस, महसूल असे सर्वच विभाग रात्रंदिवस विषाणू प्रादुर्भाव नियंत्रणासाठी झटत आहेत .नागरिकांचे सहकार्य अत्यंत मोलाचे ठरत आहे.गाव समिती, प्रभाग समिती यांना पूर्णतः सहकार्य करावे,याकडे देखील त्यांनी लक्ष वेधले आहे.
Previous Article‘त्या’ वृद्ध दाम्पत्याच्या मदतीसाठी धावले तहसीलदार
Next Article सोलापूर ग्रामीण भागात ३७ पॉझिटीव्ह रुग्ण








