प्रतिनिधी /पणजी
एनसीईआरटीच्या सातवी इयत्तेमधील ‘सोशल ऍण्ड पॉलिटिकल लाईफ – भाग 2’ या पुस्तकात डॉक्टर्सबद्दल आक्षेपार्ह मजकूर प्रकाशित झाला असून तो काढून टाकण्याची आणि अभ्यासक्रमातून वगळण्याची मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या गोवा विभागाने शिक्षण खात्याकडे केली आहे. त्या संदर्भातील निवेदन शिक्षण संचालक भूषण सावईकर यांना सादर करण्यात आले असून त्यांनी तो मजकूर वगळण्याचे आश्वासन असोसिएशनला दिले आहे. तसे परिपत्रकही काढले जाणार असल्याचे सावईकर यांनी सांगितले आहे. गोवा विभागाचे अध्यक्ष डॉ. विनायक बुवाजी, डॉ. शेखर साळकर हे निवेदन देताना उपस्थित होते.









