राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या घटतेय
प्रतिनिधी / पणजी
कोविड-19 अंतर्गत 7 सकारात्मक असलेल्या एका रुग्णावरील उपचार यशस्वी झाले आणि त्यातून त्याचा अहवाल नकारात्मक आल्यानंतर त्याला घरी जाऊ देण्यात आले. यामुळे राज्यात कोविड-19 च्या बाधित रुग्णांची संख्या 7 वरून 6 पर्यंत खाली आली आहे.
सध्याच्या कोविड – 19 रुग्णांपैकी पाच कोविडबाधित रुग्णांमध्ये सुधारणा होतेय. एका रुग्णाला नंतर आणण्यात आलेले आहे व त्यावरही उपचार सुरू आहेत. सध्या गोमेकॉच्या विलगीकरण विभागात संशयित म्हणून 4 जणांना गुरुवारी दाखल करण्यात आले तिथे एकूण 133 रुग्ण आहेत. सध्या गोवा सरकारने 24 नमुने तपासणीसाठी पाठविले त्यासाठी 9 रुग्णांचे नकारात्मक अहवाल आलेत. 15 जणांचे अहवाल अद्याप येणे शिल्लक आहेत. जे 6 सकारात्मक रुग्ण आहेत त्या सर्वांना इएसआय इस्पितळ मडगाव येथे दाखल करण्यात आलेले आहे. आतापर्यंत राज्यात 33 प्रकरणांचा अहवाल झाला जो नकारात्मक आहे.









