प्रतिनिधी/सांगली
सांगली महापालिका क्षेत्रातील विजयनगर या उपनगरात कोरोनाचा शिरकाव झाला होता. पेठभाग येथील सहकारी बँकेत काम करणाऱ्या एकास कोरोनाची लागण झाली होती. काल, रविवारी रात्री या रुग्णाचा मृत्यू झाला. मात्र त्याच्या कुटुंबातील कुटुंबातील 4 जणांचे स्वॉब निगेटिव्ह आले आहेत. यामुळे सांगलीला दिलासा देणारी ही बातमी आहे.
विजयनगर भागातील सिद्धी विनायक सोसायटी मध्ये ती व्यक्ती राहत होती. 47 वर्षीय असणारी ही व्यक्ती आठ दिवसापासून आजारी होती. या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर त्या व्यक्तीच्या कुटूंबातील 5 जणांचे स्वॉब तातडीने तपासणीसाठी घेतले होते त्यातील 4 जणांचे स्वॉब निगेटिव्ह आले आहेत. फक्त मुलाचा अहवाल येणे बाकी आहे.
Previous Articleशिरोळ तालुक्यावर महापुरानंतर आता कोरोनाचे संकट…!
Next Article सांगलीत ‘ऑनलाईन टिचींग’ चा फंडा








