सांगली / प्रतिनिधी
येत्या एक जानेवारी 2021 पासून सांगली शहर आणि जिल्ह्यात दळपाची दरवाढ केली जाणार आहे, अशी माहिती सांगली शहर गिरणी मालक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश क्षीरसागर यांनी दिली.
क्षीरसागर म्हणाले, गेल्या पाच ते सहा वर्षात कोणती दरवाढ करण्यात आली नव्हती. पण गेले काही वर्ष विजेचे दर, महापालिकेचा कर, इतर स्पेआर पार्ट यांचे दर वाढल्याने एक जानेवारीपासून दरवाढ करण्याचा निर्णय सांगली शहर गिरणी मालक संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
येत्या जानेवारीपासून हे दर पुढीलप्रमाणे राहतील. यामध्ये गहू ज्वारी प्रति किलो सहा रुपये, तांदूळ, बाजरी, नाचणी, डाळ, भाजणी, इडली, ढोकळा, रवा प्रतिकिलो आठ रुपये आणि मका, मेतकूट, साबुदाणा प्रति किलो दहा रुपये असा राहील अशी माहिती त्यांनी दिली.
घरगुती आटा चक्की वर दळणार्यांमुळे फटका. लॉकडाऊनमुळे घरगुती आटा चक्की वर दळणार्यांचे प्रमाण वाढले आहे. पण त्यांनी इतरांचेही दळण दळून देण्यास सुरुवात केली आहे. विना परवाना व्यावसायिक धंदा सुरू केल्याने गिरणी मालक संकटात सापडले आहेत. त्यामुळे नागरिकांनीही सहकार्य करणे, गरजेचे आहे.