सांगली/प्रतिनिधी
सांगलीत सुरेश तपकिरे यांच्या विश्रामबाग येथील निवासस्थानी बागेत दुर्मिळ फुलपाखरू आढळले आहे. सुसारे पंधरा इंच लांबी असलेले हे देखणे फुलपाखरू चार डोळे असलेले पांढरे स्वच्छ आहे. पंख पसरले की लांबी वाढते व चार डोळे दिसतात.
दोन दिवसापासून ते एकाच जागी आहे. ते एकाच जागेवर हालचाल करत आहे. असे फुलपाखरू आपण प्रथमच निदर्शनास आले आहे. अत्यंत देखणे भव्य व सुंदर आहे असे सुरेश तपकिरे यांनी तरुण भारतला सांगितले. निसर्ग व फुलपाखरू अभ्यासकानी याचा अभ्यास व जतन करावे असे आवाहनही त्यांनी केले.








