केंद्राची अधिसूचना: सेवा काळातील कार्याचा गौरव
कुपवाड / प्रतिनिधी
सांगली वनविभागिय कार्याल्याचे उपवनसंरक्षक विजय गजानन माने यांना भारतीय वनसेना (आयएफएस) दर्जा नुकताच बहाल करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या पर्यावरण, वने व जलवायू परिवर्तन मंत्रालयाचे उपसचिव रमेश चंद्र झा यांनी अधिसूचना जाहीर केली आहे.
विजय माने यांच्या प्रदीर्घ सेवेच्या काळानंतर केंद्र सरकारने कार्याचा गौरव म्हणून त्यांना ‘ आयएफएस ‘ बहुमान दिला आहे. माने हे सध्या आयएफएस म्हणून सेवा बजावतील, अशी अधिसूचना केंद्र सरकारच्या पर्यावरण, वने व जलवायू परिवर्तन मंत्रालयाचे उपसचिव रमेश चंद्र झा यांनी स्पष्ट केले आहे. माने यांना केंद्र सरकारने आयएफएसचा दर्जा बहाल केल्याने वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.