दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा
प्रतिनिधी / पलूस
दिल्ली येथे केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात गेले अडीच महिने सुरू असलेल्या आंदोलनाला पाठींबा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने संपूर्ण राज्यात चक्का जाम आंदोलन जाहीर केले होते. त्यानुसार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत ऊर्फ पोपट अण्णा मोरे यांच्या नेतृत्व खाली पलूसच्या मुख्य चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले या आंदोलनासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुपारी एक वाजता तासगाव कराड रोडवर ठिय्या आंदोलन करण्यात आले सुमारे अर्धा तास वाहतूक खोळंबली होती. यावेळी बोलताना जिल्हा अध्यक्ष पोपट अण्णा मोरे म्हणाले केंद्र सरकार हे उधोगपती दार्जिणे सरकार असून शेतकरी विरोधी कायदे अमलात आणून उद्योगपतींना बळ देत आहे. गेले अडीच महिने दिल्लीमध्ये शेतकरी ठाण मांडून आहेत. त्यातील दीडशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी प्राणाची आहुती दिली याचे केंद्र सरकारला कोणतीही फिकीर नाही. तरी दिल्लीच्या आंदोलनाला पाठींबा दर्शवत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पलूस कडेगाव खानापूर तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते








