प्रतिनिधी / सांगली
राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय अभियानामध्ये, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर-जिल्ह्याचा, महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक आल्याबद्दल युवक राष्ट्रवादी शहर-जिल्हाध्यक्ष. राहुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी शहर-जिल्हाध्यक्ष संजयजी बजाज, जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे, राष्ट्रवादी अल्पसंख्याक शहर-जिल्हाध्यक्ष आयुब बारगीर, नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी, विष्णु माने, माजी नगरसेवक युवराज गायकवाड, संजय सर्वदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.








