कडेगाव / प्रतिनिधी
पदवीधर निवडणूकीचे आज मतदान होत आहे. यानिमित्ताने सकाळी सकाळी कृषी मंत्री विश्वजीत कदम व संग्रामभाऊ देशमुख यांची भेट झाली.
मंत्री विश्वजीत कदम हे मतदान केंद्रांना आज भेटी देत होते. यावेळी ते काँग्रेसचे कार्यकर्ते वसंत सुर्वे यांच्या घरी बसले होते.त्यांचे घर मतदान केंद्राजवळच आहे. यावेळी संग्रामभाऊ देशमुख केंद्रांना भेट देत होते. यावेळी त्यांना मंत्री बसले आहेत कळल्यावर त्यांनी मंत्री विश्वजीत कदम यांची भेट घेतली. यावेळी मंत्री विश्वजीत कदम यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.








