प्रतिनिधी / मिरज
मिरज शासकिय वैद्यकीय महाविद्यालयातील कान नाक व घसा विभागातील अधिव्याख्याते म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टराने आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. डॉ. ग्यानबा चोखोबा सूर्यवंशी (वय ६२, रा. मूळ अमरावती, सध्या रा. कर्मवीर चौक, मिरज) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरांचे नाव आहे. घटनास्थळी पोलिसांना एक सुसाईड नोट मिळून आली आहे.
शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात कान नाक व घसा विभागातील अधिव्याख्याते डॉ. ग्यानबा सूर्यवंशी कर्मवीर चौकात युनिक प्लाझा या इमारतीत भाड्याच्या फ्लॅटमध्ये एकटेच रहात होते. चार वर्षापूर्वी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बदली झाली होती. त्यांची पत्नी व मुलगी डॉक्टर असून सोमवारी दुपारी चार वाजता ते फोन उचलत नसल्याने पत्नीने शेजार्यांना कळविले. शेजार्यांनी पाहिले असता डॉ.सोमवंशी यांनी बेडरुम मध्ये पंख्याला गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले.








