प्रतिनिधी / मिरज
रस्त्याकडेच्या बॅरिकेटला मोटरसायकलीची धडक बसून खाली पडून अंगावरून आयशीयर टेम्पो गेल्याने सुरेखा संदीप हजारे (वय ५०, रा. अंकली) ही महिला जागीच ठार झाली. तर तिचा पती संदीप हजारे हे गंभीर झाले. मिरज-म्हैसाळ रस्त्यावर मंगळवारी रात्री हा अपघात झाला.
ग्रामीण पोलीस आणि घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, संदीप हजारे आणि सुरेखा हे दोघे मिरज एमआयडीसीत एका कंपनीत काम करतात. मंगळवारी रात्री कामावरून सुट्टी झाल्यानंतर नेहमी प्रमाणे दोघे जण मोटारसायकळीवरून अंकलीकडे जात होते. मिरज म्हैसाळ रस्त्यावर आले असता, रस्त्याकडेच्या बॅरिकेटला त्यांच्या मोटरसायकलीची धडक बसली. संदीप यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. तर सुरेखा या रस्त्यावर पडल्या. तितक्यात पाठमागून कर्नाटकातून येणाऱ्या आयशीयर टोम्पोचे पुढील चाक सुरेखा हजारे यांच्या पोटावरुन गेले. यामध्ये सुरेखा या जागीच ठार झाल्या.
रात्री ग्रामीण पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली. जखमीला सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.