प्रतिनिधी / सांगली
जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 20.4 मि. मी. पावसाची नोंद झाली असून मिरज तालुक्यात 44.4 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 44.4 (56.4), जत 29.3 (42.4), खानापूर-विटा 2.8 (10.1), वाळवा-इस्लामपूर 20.3 (25.7), तासगाव 14.9 (37.1), शिराळा 12.8 (27.3), आटपाडी 0.2 (39), कवठेमहांकाळ 24.6 (38.7), पलूस 29.8 (45.7), कडेगाव 6.6 (34)








