मिरज उपनिबंधकांकडील प्रशासक नियुक्तीचा आदेश कोल्हापूर विभागाकडून रद्द
प्रतिनिधी / मिरज
सांगली जिह्यात अग्रगण्य असलेल्या मालगांव येथील जयहिंद विकास सोसायटीवर पुन्हा संचालक मंडळ कार्यरत झाले आहे. मिरज उपनिबंधकांनी संचालक मंडळ बरखास्त करुन संस्थेवर 29 डिसेंबर 2020 रोजी प्रशासकाची नियुक्ती केली होती. ती विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर यांनी फेटाळून लावली. प्रशासक नियुक्ती रद्द करुन आता पुन्हा चेअरमन आणि सचिवांना सर्वाधिकार देण्यात आले.









