प्रतिनिधी / सांगली :
लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याने मार्केट यार्ड येथील पाच धान्य दुकानावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ५० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. उपायुक्त राहुल रोकडे यांच्यासह महापालिकेच्या पथकाने ही कारवाई केली.
मार्केट यार्ड येथे सकाळी ७ ते ११ यावेळेत फक्त होलसेल किराणा, धान्य व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यास मुभा देणेत आली आहे. मात्र मार्केट यार्डात वेळेच्या नियमांचा भंग करीत अनेक होलसेल आस्थापना सुरू असतात. याची माहिती मिळताच महापालिकेच्या पथकाने यार्डात तपासणी केली. पाच धान्य दुकाने निर्धारित वेळ झाल्यानंतरही सुरू असल्याचे आढळुन आले. त्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली.