जत तालुक्यातील प्रकार
प्रतिनिधी / जत
जत तालुक्यातील कूनिकोणुर येथील माजी सैनिकांने हवेत गोळीबार केला. गंगाराम जयराम चव्हाण (वय 40) यांनी गुरुवारी रात्री आपल्या घराच्या अंगणात स्वतः जवळील परवाना धारक बंदुकीतून हवेत गोळीबार केला. या प्रकरणी उमदी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. माजी सैनिक गंगाराम चव्हाण यांनी गुरुवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घरासमोर येऊन हवेत बंदुकीतून तीन फैरी झाडल्या. अचानक त्यानी हा प्रकार का केला? हे मात्र समजू शकले नाही. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. तसेच घटनास्थळी तीन रिकाम्या पुंगळ्या मिळून आल्या आहेत.
Previous Articleगूळ सौदे सोमवारपासून पूर्ववत
Next Article आजारास कंटाळून एकाची गळा कापून आत्महत्या








