प्रतिनिधी / सांगली
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून दत्तात्रय लांघी यांनी आज पदभार स्वीकारला. आयुक्त नितीन कापडणीस यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
लांघी हे अहमदनगर जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांची नुकतीच सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून शासनाकडून नियुक्ती झाली होती. लांघी यांनी अनेक नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून आणि दोन ठिकाणी जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणुनही कामकाज पाहिले आहे.








