बाबा बर्वेंनी पुन्हा एकादा जपली सामाजिक संवेदनशीलता
प्रतिनिधी / विटा
दुष्काळ असो कि महापूर बाबा बर्वे आणि कुटुंबीयांनी नेहमीच संवेदनशीलता जपली आहे. आताही कृष्ण वारणा नदीच्या काठावर पुराचे तांडव सुरु असताना नेचर केअर फर्टिलायझर्सच्या माध्यमातून पूरग्रस्त भागातील जनावरांसाठी सुक्या चाऱ्याचे वितरण करण्यात आले. संकट आल्यानंतर कोणाच्या हाकेची वाट न बघता आपली संवेदनशीलता दाखवत जयंत तथा बाबा बर्वे यांनी मदतीच्या उपक्रमाचा शुभारंभ केला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्र, कोकणासह महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पुराचे तांडव सुरु आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. अनेक लोकांना विस्थापित व्हावे लागले आहे. या परिस्थितीत आपले उत्तरदायित्व म्हणून नेचर केअर फर्टिलायझर्सच्या माध्यमातून पूरग्रस्त भागातील जनावरांसाठी सुक्या चाऱ्याचे वाटप करण्यात आले. खानापूर तालुक्याचे तहसीलदार हृषिकेत शेळके यांच्याकडे नेचर केअर फर्टिलायझर्सचे चेअरमन जयंत तथा बाबा बर्वे यांनी हा सुका चारा हस्तांतरित केला. जिल्हा प्रशासनाच्या वतीने पूरग्रस्त भागात याचे वितरण केले जाईल.
दरम्यान तहसीलदार ऋशिकेत शेळके यांनी सदरचा चारा मिरज तालुक्यातील पूरग्रस्त भागासाठी रवाना केल्याचे सांगितले. नेचर केअर फर्टिलायझर्सच्या माध्यमातून वेळोवेळी सामाजिक बांधिलकी मानून काम केले जाते. दुष्काळ असो कि महापूर बाबा बर्वे आणि कुटुंबीयांनी नेहमीच संवेदनशीलता जपली आहे. यावेळी देखील कोणाच्याही आवाहनही वाट न बघता आपणहून पुढे येत बाबा बर्वे यांनी संवेदनशीलता आणि सामाजिक कामातील तळमळ दाखवून दिली आहे.