प्रतिनिधी / भिलवडी
भिलवडी पोलीस ठाण्यात कार्यरत व वाळवा येथील पेठभागामध्ये राहणाऱ्या असलेल्या एका ३० वर्षीय कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने वाळवा परिसरासह भिलवडी मध्ये खळबळ उडाली आहे. ४ दिवसापूर्वी सदर पोलीस कर्मचारी सातारा येथे कामानिमित्त गेला होते. त्याच ठिकाणी कोरोनाची लागण झाली असावी अशी शक्यता व्यक्त होत असून, त्यांना ताप, कणकण, खोकला अशी लक्षणे असल्यामुळे वाळवा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही.एस.नायकवडी यांनी त्यांना इस्लामपूर कोविड सेंटरला तपासणीसाठी पाठवले होते. त्यांचा कोरोना रिपोर्ट दि.५ जुलै रोजी कोरोना बाधीत आल्याने, त्यांच्या कुटुंबातील पत्नी, वृद्ध आईवडिल यांना घरातच क्वारंटाईन करण्यात आले आहे.
तर घर परिसर ग्रामपंचायतीने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून सील केला आहे. दरम्यान भिलवडी ग्रामपंचायतीच्या वतीने ही भिलवडी पोलीस ठाणे व ग्रामपंचायत कार्यालयामध्ये औषध फवारणी करण्यात आली असून, पोलीस ठाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. त्याच बरोबर संबंधित पोलिस कर्मचाऱ्याच्या संपर्कातील पोलीस बांधव व इतर लोकांचा शोध घेवून त्यांचेही स्वॅब तपासणीसाठी घेण्यात येणार आहेत. सरपंच विजय. चोपडे यांनी भिलवडी पोलीस ठाणे व ग्रामपंचायत कार्यालयामध्ये औषध फवारणी केली. भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग, पोलीस उपनिरीक्षक विशाल जगताप, सरपंच विजयकुमार चोपडे, ग्रामविकास अधिकारी आर.डी.पाटील, तलाठी गौस महंम्मद लांडगे यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








