ऑनलाईन टीम / मिरज
तालुक्यातील बेडग येथे गुटखा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य घेऊन आलेली 16 चाकी ट्रक पोलीस उपअधीक्षक संदीपसिंग गिल यांच्यासह पोलीस पथकाने पकडली. या ट्रकमध्ये सुमारे दीड कोटी रुपयांचे गुटखा साहित्य असल्याचे सांगण्यात आले. कर्नाटकातून हा माल आल्याचे स्पष्ट झाले. या कारवाईमुळे मिरज ग्रामीण भागात गुटखा तस्करी जोमात सूरु असल्याचे स्पष्ट झाले.
बेडग येथे मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास मिरज-बेडग रस्त्यावर एक ट्रक कोट्यवधी रुपयांचे गुटखा साहित्य घेऊन येणार असल्याची गोपनिय माहिती पोलीस उपअधीक्षक संदीपसिंग गिल यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकाने मिरज-बेडग रस्त्यावर सापळा रचला होतो. रात्री दीडच्या सुमारास पेट्रोलिंग करीत असताना एक 16 चाकी ट्रक (आरजे-14-3898) हा मिरजेच्या दिशेने येत असल्याचे दिसले. त्यावेळी पोलिसांनी हा ट्रक पकडून तपासणी केली असता सुगंधी तंबाखू आणि गुटखा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य मिळून आले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








