प्रतिनिधी / पलूस
कर्नाटक व तामिळनाडू राज्यांच्या घेतलेल्या निर्णयावर बैलगाडी शर्यतीला महाराष्ट्र शासनाने तात्काळ परवानगी द्यावी या मागणीसाठी पलूस तहसिल कार्यालयावर उद्या दि. ११ ऑगस्ट रोजी बैलगाडीसह मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदीप रोजोबा यांनी दिली.
मोर्चाचे निवेदन पलूस तहसिलदार निवास ढाणे व पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, कर्नाटक व तामिळनाडू च्या धर्तीवर बैलगाडी शर्यतीला शासनाने परवानगी दयावी. या मागणीसाठी पलूस तहसिलदार कार्यालयावर सुमारे पन्नास ते साठ बैलगाडी धारक शेतकरी तसेच इतर नागरिक बैलगाडीसह सहभागी होणार आहेत. हा मोर्चा पलूस बाजार समिती येथून निघणार आहे. या मोर्चाचे नियोजन संग्राम पाटील, सुर्यकांत मोरे, पोपट मोरे, जावेद शेख, धन्यकुमार पाटील, तानाजी देशमुख, ज्ञानदेव गोरड, इंद्रजीत इनामदार, विजय गावडे, अमर सिसाळ, विजय पाटील हे करीत आहेत. मोर्चात सहभागी होणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांनी कोरोनाचे नियमाचे पालन करावे, येताना मास्क, सॅनिटायझर व शासनाने घालून दिलेल्या निर्बाच पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहेत.