प्रतिनिधी / इस्लामपूर
आशियायी महामार्गावर नेर्ले दरम्यान दुचाकी व चारचाकी वाहनांच्या अपघातात ऊसतोड मजूर गंभीर जखमी झाला.हा अपघात शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास झाला.
महादेव गुलाब भोरे वय ४५ रा. माळेवाडी, तालुका पाथरी,जिल्हा परभणी असे ऊसतोड कामगाराचे नाव आहे. महादेव भोरे हे ऊसतोड कामगार म्हणून परिसरात काम करतात.ते दुपारी बाराच्या दरम्यान दुचाकी क्रमांक एम एच २२ए बी २१७५ वरून काळमवाडीच्या दिशेने आशियायी महामार्ग ओलांडून नेर्ले कडे येत होते मुख्य चौकाकडे जात असताना कोल्हापूरहुन भरधाव वेगाने कराडकडे जाणाऱ्या चार चाकी कार क्र.एम एच १४ एच के ९५३३ ने महादेव भोरे यांच्या दुचाकीला जोराची धडक बसली. या धडकेत भोरे महामार्गावर आपटल्याने त्यांच्या कानाला,खांद्याला गंभीर दुखापत झाली. यावेळी स्थानिक नागरिकांनी ॲम्बुलन्स बोलवून तात्काळ इस्लामपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. कार चालक बाळू कोंडीबा गुंजाळ रा पुणे हे स्वतःहून कासेगाव पोलिसात हजर झाले व त्यांनी अपघाताची फिर्याद दिली.








