प्रतिनिधी / नांद्रे
सध्या कोरोना संसगजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल बनले आहे. आशा परिस्थितीत लोकांना धीर देत मदत करण्याची गरज आसताना राजकीय नेते माञ कोरोनाच्या भितीने बिळात लपून बाकीच्या भानगडीत करत सामान्य लोकांचे जगणे मुश्किल करत आहेत. असा संतत्प सवाल पिडित लोक करत आहेत.
गेल्या पंधरा दिवसात नांद्रे गावात तीन रूग्ण कोरोनाने बाधीत झाले आहेत. रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाअधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी स्वयंघोषित जनता कर्फ्यू लागू केला आहे. डॉक्टर,पोलीस,सफाई कामगार, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कमेटी, सेवक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आहोरात्र मेहनत करून जिवाची बाजी लावत आहेत. लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने दोनवेळची पोटाची खळगी भरण्यासाठी मदतीची अपेक्षा करीत आसताना आशा भिषण परिस्थितीत लोकांना मदत करून त्यांना मानसिक,आर्थिक, आधार देण्याची गरज आसताना एरव्ही निवडणूकीत लाखोने उधळणारे दानशूर राजकीय नेते बिळात लपून बसून असले तरी आशा भयाण परिस्थितीत वसूलीसाठी जोरदार मोहिम राबवत असल्याचे लोक बोलत आहेत.
एकीकडे शासन, प्रशासन, पोलीस, डॉक्टर, सफाई कामगार, पञकार, ग्रामपंचायत, व ग्रामस्थ कोरोनाची लढाई लढत आसताना कोरोनाला घाबरून बिळात लपलेल्या राजकीय नेत्यांचा योग्यवेळी चांगलाच समाचार घेणार आसल्याचे बोलले जात आहे. अपवाद वगळता काही राजकीय नेत्यांनी मदत म्हणून मास्क,सॅनिटायझर,औषधाचे वाटप केले आहे. गोरगरिब नागरिकांकडे राजकीय नेत्यांनी दुर्लक्ष केले असले तरी सरकार व काही दानशूर व्यक्तीने माञ काही प्रमाणात मदत केली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








