सांगली : प्रतिनिधी
शहर स्वच्छतेसाठी राकेश दड्डणावरसह अनेक सहकारी युवक सलग 850 दिवस राबत आहेत. पालकमंत्री जयंत पाटील यांनी शहरात गेल्या दोन वर्षांपासून स्वच्छता अभियान राबवणाऱ्या या युवा स्वच्छतादूताचे म्हणजेच निर्धार फौंडेशनचे अध्यक्ष राकेश दड्डणावर यांना ट्विटरवरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा देत कौतुक केले.
शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी 1 मे 2018 महाराष्ट्र दिनापासून सुरवात झाली. निर्धार फौंडेशनच्या वतीने राकेश दड्डणावर व सहकारी दररोज सकाळी 2 तास विनामोबदला शहर स्वच्छतेसाठी राबत आहेत. गेले 850 दिवसांत या युवकांनी शहरातील घाणीचे साम्राज्य असलेल्या अनेक ठिकाणी सुंदर अशा सेल्फी पाँईट साकारले आहेत. शहरातील मुख्य रस्ते, चौक, बसस्टॉप यांचा कायापालट केला आहे. हे युवक रोजची सकाळ ही सांगलीकर जनतेच्या हितासाठी देत आहेत. या स्वच्छता दूतांच्या अभिनव उपक्रमास माझ्या शुभेच्छा, असे ट्विट केले आहे.
यावर दड्डणावर म्हणाले की, जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य तरूणाच्या शहर स्वच्छतेच्या निर्धाराची दखल घेऊन थेट त्यांच्या अधिकृत ट्वीटर, फेसबुक, इंस्टाग्राम या अकाऊंटद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा देत निर्धारच्या शहर स्वच्छतेच्या कामाचे कौतुक केले. माझ्यासारख्या तरूणांसाठी ही प्रोत्साहन देणारी बाब असून यापुढे शहर स्वच्छतेचं कार्य आणखी जोमाने करणार असल्याचे दड्डणावर सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








