प्रतिनिधी / शिराळा
बांबवडे ता. बत्तीस शिराळा येथे शेतात काम चालू असताना, एक नाग जखमी झाला होता. त्या जखमी नागास शिराळा येथील नागप्रेमींमुळे जीवदान दिले.
बत्तीस शिराळा येथे शेतामध्ये जेसीबीचे काम चालु असताना नाग जखमी अवस्थेत सापडला. याबद्दल कासेगावचे सनी बेडेकर यांनी फोन करून नागप्रेमिंना माहिती दिली. ही माहिती मिळताच सचिन घाडगे, रोहीत मोहिते, सुरज कांबळे आणि तुषार कदम यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. तर त्या जखमी नागास पशुवैद्यकीय दवाखाना शिराळा येथे उपचार केले. त्यामुळे या नागास जीवदान मिळाले. गेल्या महिन्यात बिऊर येथे रस्त्याचे काम सुरू असताना नाग जखमी झाला होता. त्याला बंटी नांगरे -पाटील आणि वनविभागाने उपचार केले होते. शिराळकरांचे नागप्रेम जगजाहीर आहे. आजपर्यंत हजारो नागांना यामुळे जीवदान मिळाले आहे.
Previous Articleमाध्यमिक शिक्षक पतपेढीच्या अध्यक्षपदी विद्या पवार
Next Article दीड वर्षात 6 खासदार, 14 आमदारांचा TMC ला रामराम








