दिघंची / वार्ताहर
नोकरीनिमित्त नागपूरला असलेल्या दिघंची येथील रमेश सिद्धेश्वर टिंगरे यांचा नागपूर येथे ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री 11 च्या सुमारास घडली. सदर रुग्णाची कोविड टेस्ट निगेटीव्ह आली होती. परंतु ऑक्सिजन न मिळाल्याने रमेश टिंगरे यांना आपले प्राण गमवावे लागले.
दिघंची येथील रमेश टिंगरे हे नागपूर येथे लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस कंपनीमध्ये नोकरीस होते. मंगळवारी ते आजारी पडले. अशक्तपणा जाणवू लागल्याने त्यांना नागपूर मधील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. शरीरातील ऑक्सिजन पातळी कमी झाल्याने त्यांची कोविडची टेस्ट करण्यात आली परंतु त्याचा अहवाल निगेटीव्ह आला परंतु त्यांना ऑक्सिजनची सुविधा मिळाली नाही. त्यामुळे ऑक्सिजन अभावी रमेश टिंगरे यांना आपले प्राण गमवावे लागले.
सध्या कोरोना मुळे ऑक्सिजन बेडची कमतरता सगळीकडे जाणवत आहे. बऱ्याच ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडत आहे. आरोग्य यंत्रणेवर देखील त्याचा ताण पडत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नॉन कोविड रुग्णांना देखील याचा फटका बसत आहे. याचीच प्रचिती मंगळवारी नागपुरात आली आणि केवळ ऑक्सिजन न मिळाल्याने रमेश टिंगरे यांना आपले प्राण गमवावे लागले. दिघंची मधील सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमात रमेश टिंगरे यांचा हिरीरीने सहभाग असायचा त्यामुळे दिघंची परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








