वार्ताहर / दिघंची
दिघंची येथील गावच्या मध्यवर्ती भागात एका डॉक्टर दाम्पत्याला कोरोनाची लग्न झाल्याने तो भाग कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला होता. सदर दाम्पत्य कोरोना मुक्त झाले आहे. त्यानंतर या परिसरात एकही संशयित रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे सदर कंटेन्मेंट झोनचा कालावधी कमी करून या भागातील व्यापरपेठ पुन्हा सुरू करावी, अशी मागणी दिघांचीचे सरपंच अमोल मोरे यांनी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्याकडे केली.
मध्यवर्ती भागात च कोरोनाचे रुग्ण सापडल्याने दक्षता म्हणून 50 मितटर परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करून तो परिसर सील करण्यात आला होता. आधीच कोरोनामुळे लहान व्यावसायिक पूर्णपणे अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे कंटेन्मेंट झोनचा कालावधी कमी करा अशी आग्रही मागणी सरपंच अमोल मोरे यांनी पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्याकडे केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब होनराव, मुन्ना भाई तांबोळी हे उपस्थित होते. बुधवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीमध्ये याबाबतचा प्रस्ताव ठेवून याबाबतची चर्चा करून योग्य ती निर्णय घेऊ अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतराव पाटील यांनी दिल्याचे सरपंच अमोल मोरे यांनी सांगितले.
Previous Articleरास्त भाव दुकानांच्या परवाना मंजुरीसाठी 10 सप्टेंबरपर्यंत मुदत
Next Article अभिनेता संजय दत्तला रुग्णालयातून डिस्चार्ज








