दिवसभरच्या संम्रमानंतर अखेर तो बिबट्या सापडला
शहराची सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
सांगली / प्रतिनिधी
सांगली शहराच्या मध्यवर्ती वस्तीत पटेल चौकात बिबट्या दिसला असे सकाळी समजले त्यावर कोण विश्वास ठेवेना. पण रात्री उशिरा हा बिबट्या जेरबंद करण्यात वनरक्षक टिमला यश आले व सर्वानी सुटकेचा सुस्कारा सोडला.
राजवाडा चौक, पटेल चौक, राँकेल लाईन, आय सी आय सी आय बँक ,पोस्ट आँफिस अशा गजबजलेल्या सांगली शहराच्या मध्यभागात सकाळी फिरायला जाणार्या एकाला बिबट्या दिसला. एका चहाविक्रेत्याने त्याला दुजोरा दिला. पण कोण त्यावर विश्वास ठेवेना पोलीसांनी हा भाग लगेच सील केला. ,वनविभाग, प्राणीमित्र अग्निशमन दलाचे जवान पोलिस यांनी या बिबट्याचा शोध सुरु केला. भितीचे वातावरण झाले. सोशल मीडियावर जूने फोटो व अफवा सुरु झाल्या दरम्यान मेलेले एक कुत्रे व बिबट्याचे ठसे राजारामबापू बँकेजवळ आढळले. शोध सुरु होता ,एक दिवस आधिच एप्रिलफूल झाले अशी थट्टाही सुरु झाली पण रात्री हा बिबट्या आढळला व त्याला पकडण्यात. यश आले. शहा यांच्या घराच्या मागील खोलीत त्यांने इतका वेळ मुक्काम ठोकला होता. हा कोठून आला असावा.या प्रश्ना बरोबरच नागरिकांची सुरक्षितता हा विषय ऐरणीवर आला आहे. शिराळा पलुस सांगली ,गव्हर्नमेंट काँलनी येथे अशा घटना पाठोपाठ समोर येत आहेत. शहरात घबराट आहे









