प्रतिनिधी / तासगाव
तासगाव सांगली रोड वर वासुंबे गावच्या हद्दीत असलेल्या श्रीकृपा ॲग्रोटेक कोल्ड स्टोरेजला आज, गुरुवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत बेदाणा व कोल्ड स्टोरेजचे मोठे नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही. तर आगीचे वृत्त समजताच तासगाव नगरपरिषद अग्निशमन पथक, दोन अग्निशमन गाड्या सह घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








