प्रतिनिधी / कडेगाव
शासनाच्यावतीने वाळू माफियांवर कारवाई करण्यात आली असून वाळू चोरीचे प्रकार पुन्हा होणार नाही याची दक्षता घेतली जाईल, असे कडेगावच्या तहसिलदार डॉ. पाटील यांनी ग्वाही देताच हणमंतवडीये येथील शेतकरी अॅड. सुभाष पाटील इंद्रजित पाटील, दत्तात्रय मोरे , मनोज मोरे. यांनी उपोषणस्थगित करून सोडण्यात आले. हणमंतवडीये येथे गुरुवारी क्रांतिविरांगणा हौसाताई पाटील यांचा आशिर्वाद घेवून येरळा नदीतील नदी पात्रामधे चोरटा वाळू उपसा कायम स्वरुपी बंद झाला पाहीजे या साठी उपोषणाला सुरवात केली.
पावसाची रिपरिप चालू असतानाही हणमंतवडीये गावातील ६० / ७० शेतकरी या अवैध वाळू उपसाच्या विरोधात भरपावसात बसून होते. येरळेतील वाळूची चोरी होऊ नये. अशी वाळू चोरी करणाऱ्याना कठोर शासन झाले पाहीजे. या साठी या गावाने नेहमीच प्रयत्न केले आहेत. तरीही मस्तवाल वाळू माफीया पुन्हा पुन्हा डोके वर काढून रात्रीच्या अंधारात वाळू चोरीचा उद्योग करीत राहतात याविरुद्ध कारवाही व्हावी अन्यथा आम्ही बेमुदत उपोसणाला बसणार असलेची नोटीस तहसिलदार कडेगाव याना दि. ६ /८/२०२० रोजी दिली होती. आंदोलकाच्या नोटीसीची दखल घेवून प्रशासनाने वडिये रायबाग मधील संबंधीत वाळु चोरांची वाळू पकडून, तिचे पंचनामे करुन, संबंधितांना नोटीसी काढणे व त्यांचे जमिनीचे ७ /१२ वर दंडाच्या रकमेचा बोजा चढवणे अशा प्रक्रिया सुरु केल्या होत्या.
आज शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष नदीपात्रातच उपोषणाला सुरवात केले मा. तहसिलदार उज्वला पाटील गावकामगार तलाठी, सर्कल इन्स्पेक्टर उपोषणाचे ठिकाणी आले होते. आपण सरकारच्यावतीने करत असलेल्या कारवाईची माहीती आंदोलकाना दिली. तसेच असे वाळू चोरीचे प्रकार पुन्हा होऊ देणार नाही, या साठी दक्षता घेवू आपण आता उपोषण सोडावे अशी विनंती केली. त्या नंतर मा. तहसिलदार पाटील यांनी अॅड. भाई सुभाष पाटील यांना पाणी देवून इंद्रजित पाटील, दत्तात्रय मोरे , मनोज मोरे यानी उपोषण सोडून आंदोलन स्थगीत केले. या प्रसंगी अॕड. सुभाष पाटील , सतिश मोरे ,माजी सरपंच संजय मोरे , श्री जगन्नाथ मोरे , श्री प्रसाद मोरे हणमंतवडीये सोसायटीचे चेअरमन किसन मस्के , सुरज गुरव ,शंतनु मोरे, करण मोरे, अच्युत सकटे वगैरे बहुसंखेने शेतकरी उपस्थित होते चिंचणी वागी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी आणि त्यांचा पोलीस स्टाफ व कडेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बिपीन हसबनिस त्यांचे पोलीस यानी चोख बंदोबस्त ठेवला होता.
Trending
- Testing1
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








