प्रतिनिधी / सांगली
महापालिका क्षेत्रात कोविडसाठी अधिकृत करण्यात आलेल्या रुग्णालयामध्ये कोविड रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ केल्यास संबंधित रुग्णालायचा परवाना रद्द करू असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. दरम्यान मिरज येथील कोव्हिड रुग्णालय सेवा सदन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मधील आठ जणांच्यावर मिरजेतील महात्मा गांधी पोलीस ठाण्यात मेस्मा कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेवा सदन हे खासगी हॉस्पिटल असून कोव्हिड रुग्णांच्या उपचारासाठी जिल्हा प्रशासनाकडून आरक्षीत आहे. मात्र सेवासदन हॉस्पिटल मधील आठ कर्मचाऱ्यांनी कोव्हिड रुग्णावर उपचार करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच अन्य हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी कोरोना रुग्णावर उपचार करण्यास टाळाटाळ केल्यास किंवा ज्या आरोग्य सेवकांना उपचारबाबत नियुक्ती देण्यात आली आहे मात्र ते हजर आले नसतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल. याचबरोबर ज्या दवाखान्यांना कोविड हॉस्पिटल म्हणून परवानगी देण्यात आली आहे. त्या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास असमर्थता दर्शवित असेल तर त्यांच्यावर परवाना रद्दची कारवाई करावी लागेल असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








