एक लाख 13 हजार 93जणांनी घेतले दोन्ही डोस
प्रतिनिधी / सांगली
सांगली जिल्ह्यात जेष्ठ नागरिकांना दूसरा डोस देण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले असून एक लाख 13 हजार 93 जणांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. आज दिनांक १५ मे रोजी दिवसभरात 1289 जणांना दुसरी लस देण्यात आली.
जिल्ह्यात लसीकरणासाठी जागृतता आहे. मागणी आहे. जिल्ह्यात आजअखेर सुमारे 646947 जणांना लस देण्यात आली आहे त्यापैकी 5 लाख 33 हजार जणांना पहिला डोस मिळाला आहे.








