प्रतिनिधी / सांगली
सांगली जिल्ह्यात आज विक्रमी एक हजार 74 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. नवे 690 रूग्ण वाढले आहेत. त्यामुळे जिल्हयाची एकूण रूग्णसंख्या आता 30 हजार 22 झाली आहे. उपचार सुरू असताना जिल्ह्यातील 33 जणांचे मृत्यू झाले आहेत. एकूण जिल्ह्यात 1135 जणांचा आजअखेर कोरोनाने बळी गेला आहे.
महापालिका क्षेत्रात 145 रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्रात सोमवारी 145 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये सांगली शहरात 116 तर मिरज शहरात 29 रूग्ण वाढले आहेत. गेल्या चार दिवसांपासुन सांगली शहरात मोठयासंख्येने रूग्ण वाढत होते. पण सोमवारी त्याला बेक बसला आहे. महापालिका क्षेत्रात आता घर टू घर सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. तसेच ज्यांना कोरोनाचा त्रास होत आहे. त्यांची तपासणीही सुरू करण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रात आजअखेर एकूण रूग्णसंख्या 12 हजार 352 झाली आहे.
ग्रामीण भागात 545 रूग्ण वाढले
सोमवारी ग्रामीण भागात 545 नवे रूग्ण आढळून आले आहेत. ग्रामीण भागात मोठ्या संख्येने रॅपीड ऍण्टीजन टेस्ट सुरू केल्याने ही रूग्णसंख्या वाढत चालली आहे. तालुकानिहाय वाढलेली रूग्णसंख्या अशी, आटपाडी तालुक्यात 41, जत तालुक्यात 38, कडेगाव तालुक्यात 50 नवीन रूग्ण वाढले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात 69, खानापूर तालुक्यात 61, मिरज तालुक्यात 51 रूग्ण वाढले आहेत. पलूस तालुक्यात 40, शिराळा तालुक्यात 43, तासगाव तालुक्यात 61 आणि वाळवा तालुक्यात 91 रूग्ण वाढले आहेत.
जिल्ह्यातील 33 जणांचा मृत्यू
जिल्ह्यातील 33 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली शहरातील दहा जणांचा मृत्यू झाला आहे. मिरज शहरातील एकाचा मृत्यू झाला आहे. तर कुपवाड येथील एकाचा मृत्यू झाला आहे. आटपाडी तालुक्यातील दोघांचा, जत तालुक्यातील एकाचा, कडेगाव तालुक्यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील तिघांचा, खानापूर तालुक्यातील एकाचा, मिरज ग्रामीण भागातील तिघांचा मृत्यू झाला. तासगाव तालुक्यातील दोन जणांचा, पलूस तालुक्यातील तिघांचा, शिराळा तालुक्यातील दोन जणांचा आणि वाळवा तालुक्यातील तीन जणांचे उपचार सुरू असताना मृत्यू झाले आहेत. जिल्ह्याततील एकूण 33 जणांचा सोमवारी मृत्यू झाला आहे. आजअखेर 1135 जणांचे मृत्यू झाले आहेत.
परजिल्ह्यातील नवे 15 रूग्ण दाखल
परजिल्ह्यातील नवीन 15 रूग्ण जिल्ह्यातत उपचारासाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातत आजअखेर परजिल्ह्यातील 956 जणांच्यावर उपचार करण्यात आला त्यातील 519 जण कोरोनामुक्त होवून गेले तर 279 जणांच्यावर आता उपचार सुरू आहेत. तर आजअखेर 158 जणांचा मृत्यू झाला आहे.
विक्रमी एक हजार 74 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात सोमवारी विक्रमी एक हजार 74 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आजपर्यंत एकाच दिवसांत कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची सर्वात मोठी संख्या आहे. जिल्ह्यातत आजअखेर बरे झालेल्या रूग्णांची संख्या ही 19 हजार 664 झाली आहे. जवळपास 65 टक्के रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. जिल्ह्यातत मोठ्याप्रमाणात रूग्ण वाढत असतानाच कोरोनामुक्त होणारे रूग्णही वाढत चालल्याने जिल्ह्यातला हा मोठा दिलासा मिळत आहे. त्यामध्ये रविवारी इाणि सोमवारी वाढलेल्या रूग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्या मोठ्याप्रमाणात आहे. त्यामुळे हा एक जिल्ह्यातला मोठा दिलासा मिळाला आहे.
2417 जणांचे स्वॅब तपासले
जिल्ह्यात सोमवारी दोन हजार 417 जणांचे स्वॅब तपासले आहेत. यामध्ये आरटीपीसी मधील 765 स्वॅब तपासणी केली तर रॅपीड ऍण्टीजन टेस्टमध्ये एक हजार 1652 जणांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये नवीन 690 रूग्ण आढळून आले आहेत.
कोरोनाची जिल्ह्यातील स्थिती
एकूण रूग्ण 30022
बरे झालेले 19664
उपचारात 9223
मयत 1135
Previous Articleकोरोना बाधितांपेक्षा कोरोनमुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक
Next Article सातारा : सज्जनगड परिसरात बिबट्याचा वावर








