प्रतिनिधी / सांगली
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरपट्यातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. ज्या ठिकाणचा पूर ओसरत आहे त्याठिकाणी काही कुटुंबे घरी परतली असून सध्या ७ हजार ९०५ कुटुंबातील ३७ हजार ६५५ व्यक्ती स्थलांतरीत आहेत. तसेच लहान व मोठी अशा एकूण ७ हजार ९८ जनावरेही स्थलांतरीत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
जिल्ह्यात पूरस्थितीमुळे पूर्णत: बाधित १०, अंशत: बाधित ९५ अशी एकूण १०५ गावे बाधित आहेत. यामध्ये मिरज तालुक्यात महानगरपालिका क्षेत्र (शहरी) अंशत: १ गाव, ग्रामीणमध्ये अंशत: ५ गावे बाधित आहेत. अप्पर सांगली (ग्रामीण) मध्ये १५ गावे अंशत: बाधित आहेत. वाळवा तालुक्यात वाळवा क्षेत्रातील २ गावे पूर्णत: व २९ गावे अंशत: अशी एकूण ३१ गावे बाधित आहेत. अपर आष्टा क्षेत्रातील १ गाव पूर्णत: व ८ गावे अंशत: अशी एकूण ९ गावे बाधित आहेत. शिराळा तालुक्यात १ गाव पूर्णत: तर १८ गावे अंशत: अशी एकूण १९ गावे बाधित आहेत. तर पलूस तालुक्यातील ६ गावे पूर्णत: व १९ गावे अंशत: अशी एकूण २५ गावे बाधित आहेत.
महानगरपालिका क्षेत्र (शहरी) 5 हजार 460 कुटुंबामधील 27 हजार 181 व्यक्ती, मिरज ग्रामीण क्षेत्रातील 950 कुटुंबातील 3 हजार 883 व्यक्ती, अपर सांगली ग्रामीण मधील 236 कुटुंबातील 669 व्यक्ती स्थलांतरीत आहेत. वाळवा क्षेत्रातील 735 कुटुंबातील 3 हजार 422 व्यक्ती तर शिराळा तालुक्यातील 16 कुटुंबातील 87 व्यक्ती, पलूस तालुक्यातील 508 कुटुंबातील 2 हजार 413 व्यक्ती स्थलांतरीत आहेत.
मिरज तालुक्यातील महानगरपालिका क्षेत्र (शहरी) 340, मिरज ग्रामीण क्षेत्रातील 4 हजार 627, अपर सांगली ग्रामीण क्षेत्रातील 246, वाळवा क्षेत्रातील 894, शिराळा तालुक्यातील 501, पलूस तालुक्यातील 490 जनावरे स्थलांतरीत आहेत.
जिल्ह्यातील 39 तातपुरत्या स्वरुपात छवण्या उभारण्यात आल्या आसून त्यामध्ये 1 हजार 416 गायी, 1 हजार 700 म्हैशी, 361 लहान वासरे/रेडके 819 शेळ्यांचा समावेश आहे. तसेच स्वंयसेवी संस्था, दानशूर व्यक्ती यांच्याकडून 88 मेट्रीक टन पशुखाद्य संकलीत झाले आहे.