28 जणांचे मृत्यूः मनपा क्षेत्रात 138 वाढलेः ग्रामीण भागात 292 रूग्ण वाढले
प्रतिनिधी / सांगली
रविवारी जिल्ह्यातील 855 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांच्या फक्त निम्म्याने नवीन रूग्ण वाढले आहेत. त्यामुळे जिल्हÎाला दिलासा मिळाळा आहे. नवे 430 रूग्ण वाढले. जिल्ह्यात आजअखेर 24 हजार 776 रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. पण उपचार सुरू असताना 28 जणांचे मृत्यू झाले आहेत. एकूण जिल्हÎात 1287 जणांचा आजअखेर कोरोनाने बळी गेला आहे.
महापालिका क्षेत्रात 138 रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्रात नवीन 138 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये सांगली शहरात 96 तर मिरज शहरात 42 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात आता घर टू घर सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. तसेच ज्यांना कोरोनाची लक्षणे दिसत आहेत. तसेच कोरोना रूग्णांच्या संपर्कात जे आले आहेत. त्यांची तपासणीही सुरू करण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रात आजअखेर एकूण रूग्णसंख्या 13 हजार 281 झाली आहे.
ग्रामीण भागात 292 रूग्ण वाढले
ग्रामीण भागात नवे 292 नवे रूग्ण आढळून आले आहेत. ग्रामीण भागात मोठÎा संख्येने रॅपीड ऍण्टीजन टेस्ट सुरू केल्याने ही रूग्णसंख्या वाढत आहे. तालुकानिहाय वाढलेली रूग्णसंख्या अशी, आटपाडी तालुक्यात आठ, जत तालुक्यात 11, कडेगाव तालुक्यात 43 नवीन रूग्ण वाढले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात 21, खानापूर तालुक्यात 29, मिरज तालुक्यात 63 रूग्ण वाढले आहेत. पलूस तालुक्यात 32, शिराळा तालुक्यात 16, तासगाव तालुक्यात 36 आणि वाळवा तालुक्यात 33 रूग्ण वाढले आहेत.
जिल्ह्यातील 28 जणांचा मृत्यू
जिल्हÎातील 28 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली शहरातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. आटपाडी तालुक्यातील एकाचा, कडेगाव तालुक्यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील तिघांचा, मिरज ग्रामीण भागातील सहा जणांचा मृत्यू झाला. पलूस तालुक्यातील चौघांचा, तासगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू झाला. शिराळा तालुक्यातील दोघांचा आणि वाळवा तालुक्यातील चार जणांचे उपचार सुरू असताना मृत्यू झाले आहेत. जिल्हÎातील एकूण 28 जणांचा रविवारी मृत्यू झाला आहे. आजअखेर 1287 जणांचे मृत्यू झाले आहेत.
परजिल्ह्यातील नवे 19 रूग्ण दाखल
परजिल्हÎातील नवीन 19 रूग्ण जिल्हÎात उपचारासाठी दाखल झाले आहेत. त्यामध्ये कोल्हापूरचे नऊ, बेळगावचे तीन, सोलापूरचे पाच आणि तेलंगणाचे दोन रूग्ण दाखल झाले आहेत. त्यामुळे जिल्हÎात आजअखेर परजिल्हÎातील 1150 जणांच्यावर उपचार करण्यात आला त्यातील 658 जण कोरोनामुक्त होवून गेले तर 316 जणांच्यावर आता उपचार सुरू आहेत. आजअखेर 176 जणांचा मृत्यू झाला आहे.
नवीन रूग्णापेक्षा रविवारी दुप्पट रूग्ण कोरोनामुक्त
जिल्हÎात रविवारी 855 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. नवीन रूग्णापेक्षा दुप्पट रूग्ण बरे झाले आहेत. सलग आठव्या दिवशी वाढलेल्या नवीन रूग्णांपेक्षा कोरोनामुक्त रूग्णांची संख्या अधिक असल्याने जिल्हÎाला फार मोठा दिलासा मिळत चालला आहे. जिल्हÎात आजअखेर बरे झालेल्या रूग्णांची संख्या ही 24 हजार 776 झाली आहे. जवळपास 72 टक्के रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. जिल्हÎात मोठÎाप्रमाणात रूग्ण वाढत असतानाच कोरोनामुक्त होणारे रूग्णही वाढत चालल्याने जिल्हÎाला हा मोठा दिलासा मिळत आहे. त्यामध्ये सलग आठ दिवस वाढलेल्या रूग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्या मोठÎाप्रमाणात आहे.
1690 जणांचे स्वॅब तपासले
जिल्हÎात रविवारी एक हजार 690 जणांचे स्वॅब तपासले आहेत. यामध्ये आरटीपीसी मधील 840 स्वॅब तपासणी केली तर रॅपीड ऍण्टीजन टेस्टमध्ये 850 जणांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये नवीन 430 रूग्ण आढळून आले आहेत.
कोरोनाची जिल्ह्यातील स्थिती
एकूण रूग्ण 33877
बरे झालेले 24776
उपचारात 8814
मयत 1287