प्रतिनिधी / सांगली
गुरूवारी जिल्हय़ात नवीन 313 रूग्ण वाढले तर 171 जण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचार सुरू असताना 16 जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये जिल्हय़ातील 15 जणांचा आणि परजिल्हय़ातील एकाचा समावेश आहे. एकूण जिल्हय़ात 191 जणांचा आजअखेर कोरोनाने बळी गेला आहे.
महापालिका क्षेत्रात 212 रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्रात गुरूवारी 212 रूग्ण वाढले. त्यामध्ये सांगली शहरात 118 तर मिरज शहरात 94 रूग्ण वाढले आहेत. महापालिकेकडून मोठय़ाप्रमाणात ऍण्टीजन टेस्ट सुरूच ठेवल्या आहेत. आजपर्यंत सात हजार 800 हून अधिक जणांच्या त्यांनी ऍण्टीजन टेस्ट केल्या आहेत. त्यामुळे त्यामध्ये मोठयासंख्येने रूग्ण वाढत चालले आहेत. सांगली शहरात जे नवीन रूग्ण वाढले आहेत. ते रूग्णांच्या संपर्कात आलेले नातेवाईक आहेत. खणभाग, गावभाग, शंभरफुटी, एमएसईबी रोड, गर्व्हेमेंट कॉलनी, विजयनगर पुर्वा गार्डनजवळ, शिंदे मळा, विद्या सोसायटी, सांगलीवाडी, अभयनगर, सहय़ाद्रीनगर, गुलमोहोर कॉलनी, हरीपूर रोड या भागातील हे रूग्ण आहेत. तर मिरजेत जे रूग्ण आढळून आले आहेत. ते भारतनगर, जीएमसीएच, साईनाथ पार्क, इंदिरानगर, बेथेलहेमनगर, मंगळवार पेठ, लोकमान्य कॉलनी, नदीवेस याठिकाणी आढळून आले आहेत. सांगली मिरज महापालिका क्षेत्रात मात्र आजअखेर एकूण रूग्णसंख्या तीन हजार 436 झाली आहे.
ग्रामीण भागात बुधवारी 101 रूग्ण वाढले
गुरूवारी ग्रामीण भागात तब्बल 101 रूग्ण आढळून आले त्यामध्ये आटपाडी तालुक्यात आठ, जत तालुक्यात पाच, कडेगाव तालुक्यात 13, तर कवठेमहांकाळ तालुक्यात सहा रूग्ण वाढले आहेत. खानापूर तालुक्यात चार, मिरज तालुक्यात 16 रूग्ण वाढले आहेत. पलूस तालुक्यात 16, शिराळा तालुक्यात दोन, तासगाव तालुक्यात 22 आणि वाळवा तालुक्यात नऊ रूग्ण वाढले आहेत. असे एकूण ग्रामीण भागात 101 रूग्ण वाढले आहेत.
जिल्हय़ातील तब्बल 15 जणांचा मृत्यू
गुरूवारी जिल्हय़ातील 15 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली शहरातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील सांगलीवाडी येथील 55 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात तसेच 78, 60 आणि 45 वर्षीय व्यक्तींचा मिरजेच्या कोरोना रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मिरजेतील चार व्यक्तीचा मृत्यू झाला त्यामध्ये 65 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात तर 40 आणि 68 वर्षीय व्यक्तीचा वानलेस हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मिरजेतील 62 वर्षीय महिलेचा मिरज चेस्ट हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. तासगाव येथील 77 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात मृत्यू झाला.तर 71 वर्षीय व्यक्तीचा प्रकाश हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. मिरज तालुक्यातील मालगाव येथील 78 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात मृत्यू झाला. तर इनामधामणी येथील 54 वर्षीय व्यक्तीचा अदित्य हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. वाळवा तालुक्यातील आष्टा येथील 75 वर्षीय व्यक्तीचा भारती हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. जत तालुक्यातील आवंढी येथील 65 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात मृत्यू झाला तर कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण येथील 85 वर्षीय महिलेचा मिरज चेस्ट हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. या 15 व्यक्तीच्या मृत्यूमुळे जिल्हय़ातील एकूण बळीची संख्या 191 झाली आहे. गुरूवारी परजिल्हय़ातील एकाचा मृत्यू झाला आहे त्यामध्ये कोल्हापूर येथील 58 वर्षीय व्यक्तीचा भारती हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. परजिल्हय़ातील 56 जणांचे आजअखेर मृत्यू झाले आहेत.
171 जण कोरोनामुक्त
गुरूवारी जिल्हय़ात उपचार सुरू असणारे 171 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सलग तिसऱया दिवशी मोठय़ासंख्येने रूग्ण बरे झाल्याने रूग्ण बरे होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जिल्हय़ात आजअखेर बरे झालेल्या रूग्णांची संख्या दोन हजार 952 झाली आहे. त्यामुळे रूग्ण बरे होण्याची टक्केवारी वाढतच चालली आहे.
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण 5577
बरे झालेले 2952
उपचारात 2434
मयत 191