बिसुर-खोतवाडी रस्त्यावरील घटना; चुलत भावसह दोघे ताब्यात
प्रतिनिधी/सांगली
अवघ्या २१ गुंठे असलेल्या जमिनीच्या वादातून वसगडे (ता. पलूस) येथील युवकाचा डोक्यात दगड घालून तसेच कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला. प्रशांत उर्फ बल्लू आदगोंडा पाटील (वय २६) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. येथील बिसुर-खोतवाडी रस्त्यावर काल, गुरुवारी (दि.20) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. रात्री उशिरा येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
दरम्यान या प्रकरणी मृत प्रशांतचा चुलत भाऊ तेजस देवगोंडा पाटील व आणखी एका युवकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या कडे कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान घटना घडल्यांनातर पोलीस उपअधीक्षक अजित टिके, सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांनी घटना स्थळी भेट दिली. याबाबत अधिक माहिती अशी की, मृत प्रशांत आणि त्याचे चुलते यांची गावात २१ गुंठे जमीन होती. त्यापैकी सात गुंठे जमीन प्रशांतच्या वाटणीला येत होती. यावरून वाद निर्माण झाला होता. मृत प्रशांत वीर बाबासाहेब कुचनुरे नागरी सहकारी पतसंस्थेच्या कवलापूर येथील शाखेत लिपिक म्हणून काम करत होता.
गुरुवारी संस्थेतील काम पूर्ण मारून प्रशांत घरी निघाला होता. सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास संशयित तेजस आणि त्याच्या मित्राने बिसुर-खोतवाडी रस्त्यावर प्रशांतला गाठले. त्यांच्यामध्ये वाद झाला. वाद वाढल्याने संशयित तेजस आणि त्याच्या मित्राने प्रशांतवर कोयत्याने हल्ला चढवला. डोक्यात दगड घातला. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने प्रशांतचा काही वेळेतच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात हलवला. दरम्यान या घटनेने वसगडे येथे खळबळ माजली. अनेक नागरिकांनी शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती.
जमिनीच्या वादातूनच खून
प्रशांत मनमिळावू होता. गावातील एका सामाजिक संस्थेसाठी काम करत होता. वडिलांचे छत्र हरविल्याने संपूर्ण कुटुंबाचा भार त्याच्यावर होता. आई अंगणवाडी सेविका म्हणून काम करते. चुलत भाऊ आणि त्याच्या मध्ये अवधी २१ गुंठे जमीन आहे. त्यापैकी ७ गुंठे जमीन त्याच्या वाट्याला येत होती. याच जमिनीव
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








