दुर्मिळ गव्हाणी घुबडाचे पलूस शहरातील वास्तव्य सुखावणारे
प्रतिनिधी/पलूस
आडात पडलेल्या गव्हाणी घुबडास पलूस येथील श्रीराम कुलकर्णी यांनी जीवदान दिले. कुलकर्णी यांना आपल्या आडात एक पक्षी पडल्याचे आढळून आले. त्यांनी कँरेटला दोरी बांधून त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. अखेर शर्थीच्या प्रयत्नांनी कुलकर्णी यांनी या पक्षास आडातून बाहेर काढले.
सदर पक्षी गव्हाणी घुबड असून त्याचा एक पंख जखमी असल्याचे लक्षात आले. याबाबत वन विभागाचे परिमंडल अधिकारी मारूती ढेरे यांच्या कळविण्यात आले. त्यानंतर या घुबडास वनमजूर दुबिले यांनी ताब्यात घेऊन पुढील उपचारासाठी चौरंगीनाथ येथे नेण्यात आले. गव्हाणी घुबड हा पक्षी दुर्मिळ होत चाललेला असतानाच पलूस शहरात त्याचे वास्तव्य सुखावणारे असून दिवसभर हा चर्चेचा विषय ठरला.
Previous Articleरताळी दर वधारला, कांदा दरात घसरण
Next Article पॅसेंजर रेल्वेअभावी प्रवाशांचे हाल








