प्रतिनिधी / सांगली
जिल्ह्यात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला आहे. 10 ते 19 सप्टेंबर अखेर सांगली व मिरज शहरात गणेश मुर्ती विसर्जनासाठी वापरण्यात येणारी वाहने, पोलीस वाहने, अम्बुलन्स, फायर ब्रिगेड, महानगरपालिकेची स्वच्छता करणारी वाहने या वाहनांखेरीज सर्व वाहनांना सांगली, मिरज शहरामध्ये मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. तसेच सांगली व मिरज शहरातील वाहतुक व्यवस्थेमध्येही बदल करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधिक्षक दिक्षीत गेडाम यांनी दिली आहे.
सांगली मिरज कुपवाड शहरांमध्ये 19 सप्टेंबर अखेर वाहतुकीच्या नियमांचा बदल राहणार असून सर्व अवजड वाहने शहरातील प्रमुख बाजारपेठांमधून न जाता बायपास रोडने शहराच्या बाहेर जातील तसेच शहरात प्रवेश करतील. त्याची वाहन चालक व नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








