नांद्रे / प्रतिनिधी
गतसाली 2020 व चालू 2021 सालात कोरोना महामारीत अत्यंत चोख कामगिरी बजावणारे नांद्रे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, नर्स, आरोग्य सेवक, रूग्णवाहिका चालक व सर्व कर्मचाऱ्यांची कामगिरी उल्लेखनिय आहे. कोरोनाच्या महामारीत प्रबोधन, नोंदी, लसीकरण, विविध चाचण्या, रूग्णांना शोधून त्यांच्यावर योग्यवेळी योग्य औषधोपचार करत धीर देऊन त्यांना बरे करेपर्यंत उत्तम सेवा देण्याची कामगिरी उल्लेखनिय आसून हे त्यांचे दैनदिन कामच झाले आहे.
वैधकीय अधिकारी डॉ. गुरव, डॉ. चवरे मँडम यांच्या मार्गदशनाखाली आरोग्य सेवक वावरे, मिरजकर, किरकिरे,तांबोळी,राजू माळी यांच्यासह सर्व सेवक प्रामाणिकपणे कोरोनाची लढाई लढत आहेत.
परंतु कोरोना महामारीत केवळ प्राथमिक आरोग्य विभाग अग्रेसर आसून चालणार नाही. जबाबदार नागरिक म्हणून आपली ही जबाबदारी आहे हे विसरून चालणार नाही. काही लोक विना मास्क, विनाकारण घराबाहेर पडून ठिकठिकाणी गप्पा मारत बसलेली आसतात. त्यामुळे नियमाचे पालन करणाऱ्या कोरोना योद्धयांना त्यांचा नाहक ञास होत आहे. आपल्या सुरक्षतेसाठि शासन विविध उपाययोजना करत आहे. डॉक्टर,पोली आपला जिव धोक्यात घालून आपल्या सुरक्षतेची काळजी घेत आहेत.त्यांना कोरोनाची भिती नाही का? त्यांना देखील संसार आहे, ती देखील आपल्या सारखीच माणस आहेत. त्यांना ही भावना आहेत. त्यांचा विचार नागरिकांनी करणे गरजेचे आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









