सांगली / प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा नविन व्हेरियंट ओमिक्रॉन आता जगभरात गेल्या काही दिवसांमध्ये सर्वात वेगाने पसरत आहे. म्हणून समोर आला आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात एकूण 88 ओमिक्रॉन कोविड-19 प्रकरणे नोंदली गेली आहेत. गेल्या आठवड्यात राज्यात कोविड-19 ची प्रकरणेही वाढू लागली आहेत. आणि गेल्या दोन महिन्यांत प्रथमच राज्यात दररोज १ हजार हून अधिक पॉझिटीव्ह केसेसची नोंद होत आहे. आगामी काळात सण, लग्नसराई आणि नवीन वर्ष साजरे करण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या संख्येने लोक एकत्र येण्याची शक्यता असल्याने राज्यात अतिरिक्त निर्बंध लावण्याबाबतचा आदेश पारित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडील आदेशान्वये जारी केलेल्या निर्बंधाव्यतिरिक्त जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी राज्य शासनाकडील आदेशान्वये सांगली जिल्ह्यात खालीलप्रमाणे अतिरिक्त निर्बंध लागू केले आहेत.