प्रतिनिधी/आटपाडी
कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करताना जनतेमध्ये जनजागृती करण्यासह त्यांच्या अडचणींची सोडवणूक करण्यासाठी माजी सभापती हर्षवर्धन देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे. “हर्षवर्धन देशमुख युवा पर्व”च्या माध्यमातून जनतेसाठी हेल्पलाईन सेवा आणि वाहनाद्वारे जनजागृती गोहिम राबविली जात आहे. कोरोनाबाधितासह नातेवाईकाना हर्षवर्धन देशमुख युवा पर्वच्या उपक्रमांचा दिलासा मिळत आहे.
कोरोनाचे संक्रमण फैलावत असताना मार्च महिन्यापासून आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख हे सक्रियपणे योगदान देत आहेत. बाहेरून आलेल्याची सोय करणे, विलगीकरण केलेल्या ठिकाणांना भेटी देणे, सीसीसी कार्यान्वित करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणे, आरोग्य केंद्रांना भेटी देवून डॉक्टरांशी संवाद साधने यासह लोकांच्या अडचणी प्रशासनाकडुन सोडवुन घेण्यात ते सक्रिय राहिले.
आटपाडी तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ११००च्या वर पोहचली आहे. एकूण १८ बाधितांचा मृत्यू झाला आहे. हा पैलाव वाढत असताना आपल्या तरुण सहकाऱ्यासह हेल्पलाईन सेवा सुरू करून हर्षवर्धन देशमुख यानी बाधिताना बेडची उपलब्धता व अन्य मदतीसाठी एक आदर्शवत पाऊल टाकले आहे. २४ तास हेल्पलाईन सेवा सुरू ठेवुन तरुण सहकारी व स्वत. लोकांच्या सेवेत सक्रिय आहेत. त्यामुळे कठीण कालावधीत अनेकांना दिलासा मिळत आहे.
लोकांमध्ये कोरोनाबाबत प्रबोधन करण्यासाठी नुकतीच वाहनाद्वारे जनजागृती मोहिम हर्षवर्धन देशमुख युवा पर्वच्या माध्यमातुन सुरू झाली. प्रांत संतोष भोर, तहसीलदार सचिन लंगुटे , माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, सभापती भुमिका बेरगळ, उपसभापती रूपेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य अरुण बालटे, बीडीओ भोसले , आरोग्य अधिकारी डॉ. उमाकांत कदम यांच्या उपस्थितीत प्रबोधन वाहनाला हिरवा झेंडा दाखविन्यात आला.
आटपाडी तालुक्यातीत कोरोनाचा फैलाव गतीने होत आहे. आरोग्य यंत्रणा कष्ट घेत आहे. त्याला लोकांनी साथ धावी आणि जनतेच्या मदतीसाठी स्वयं सेवकांनी पुढे यावे असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








