जिल्हा उपनिबंधकाची नियुक्ती: अनिल शेगुणशे यांची माहिती
कुपवाड / प्रतिनिधी
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सभापती दिनकर पाटील यांनी सावळी येथे खरेदी केलेली जमीन, नोकर भरती, गाळे वाटप तसेच जागा विक्री आदी प्रकरणात कोटयावधीचा भ्र्ष्टाचार केल्याची तक्रार कानडवाडीचे सरपंच अनिल शेगुणशे यांनी राज्याचे पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे पुराव्यासंह केली होती.
यासंदर्भात पणनमंत्री पाटील यांनी तक्रारीनुसार पणन संचालक पुणे यांना बाजार समितीतील झालेल्या विविध प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत. या चौकशीसाठी पणन संचालक सतिश सोनी, पुणे यांनी जिल्हा उपनिबंधक सांगली यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता चौकशी होऊन कारवाई होणार असल्याची माहिती अनिल शेगुनशे यांनी दिली.
दरम्यान, याप्रकरणी सखोल, पारदर्शी व निपक्षपातीपणे चौकशी न झाल्यास पुन्हा सभापती दिनकर पाटील यांसह जिल्हा उपनिबंधक व बाजार समितीच्या सर्व संचालकांविरोधात उच्च न्यायालयात दावा दाखल करणार असल्याच्या इशारा शेगुनशे यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत दिला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








